yuva MAharashtra जत नगरपरिषद निवडणूक अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवसाअखेर 22 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल; तिरंगी लढत निश्चित

जत नगरपरिषद निवडणूक अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवसाअखेर 22 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल; तिरंगी लढत निश्चित

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;

     जत नगरपरिषद निवडणुकीत पाचव्या दिवसअखेर २२ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा उमेदवारांमुळे नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत तीव्र. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज आणखी मोठी गर्दी अपेक्षित.
     जत नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला मोठा वेग आला असून पाचव्या दिवसअखेर एकूण २२ नगरसेवक पदांसाठी आणि १ नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल झाले आहेत. ही माहिती जत नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर यांनी दिली.
     जत नगरपरिषदेतील ११ प्रभागांतील एकूण २३ जागांवर नगरसेवक व नगराध्यक्ष पदांसाठी २ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर अशी असून, त्यातील पाचव्या दिवसापर्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद दिसून आला आहे.
आजअखेर दाखल झालेले अर्ज - प्रमुख उमेदवारांची नावे;
     शुक्रवारी, नगरसेवक पदांसाठी दाखल झालेल्या १८ अर्जांसह एकूण २२ उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
  • प्रभाग १०अ — अमीर बाबासो नदाफ (अपक्ष), नदाफ अमीर बाबांसो (इंडियन नॅशनल काँग्रेस), नदाफ रमजान मोहिद्दीन (अपक्ष)
  • प्रभाग ९ब — प्रमोद गुनाप्पा डोळळी (भा.ज.पा.), एक अपक्ष अर्ज; मोटे दिपक तुकाराम (भा.ज.पा.), कुलकर्णी मोहन सुभाष (इंडियन नॅशनल काँग्रेस)
  • प्रभाग ६ब — ताड विक्रम शिवाजी (भा.ज.पा.)
  • नगराध्यक्ष पद — पवार नवनाथ सोपान (अपक्ष)
  • प्रभाग ३अ — पट्टणसेट्टी सीमा संतोष (भा.ज.पा.)
  • प्रभाग ३ब — ऐवाळे गौतम रामचंद्र (भा.ज.पा.)
  • प्रभाग ४अ — साबळे संतोष रमेश (बहुजन समाज पार्टी)
  • प्रभाग ५ब — गवंडी इम्रान इकबाल (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)
  • प्रभाग ६अ — सोनुले संगीता अविनाश (भा.ज.पा.)
  • प्रभाग ८अ — चौगुले हेमंत आशाराम (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)
  • प्रभाग ११अ — काळे काजल राहुल (इंडियन नॅशनल काँग्रेस)
  • प्रभाग ११क — जगताप संग्राम प्रमोद (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), भिसे मिथुन रमेश (भा.ज.पा.)
  • प्रभाग १०ब — सोनवणे तेजस्विनी श्रीकांत (बहुजन समाज पार्टी)
  • प्रभाग ७ब — मळगे एकनाथ शिवाजी (अपक्ष)
  • प्रभाग ८ब — पाटणकर सुवर्णा दिपक (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)
आजपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला असला तरी, प्रत्यक्ष निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता निश्चित झाली आहे. विविध पक्षांकडून पुढील उमेदवारांची नावे जाहीर आहेत:
इंडियन नॅशनल काँग्रेस — सुजय उर्फ नाना शिंदे (सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती)
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष — सुरेश शिंदे (माजी सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती)
भाजप — डॉ. रवींद्र आरळी
   या तिन्ही उमेदवारांच्या पार्श्वभूमीमुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दीचा ओघ वाढणार;
    शनिवारचा दिवस असल्यामुळे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी अपेक्षित आहे. शुक्रवारी देखील भावी नगरसेवक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी तहसील कार्यालय परिसरात लक्षणीय प्रमाणात उपस्थिती लावली होती.