जतवार्ता न्यूज नेटवर्क;
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक, देशाचे प्रगल्भ, दूरदृष्टीचे व सर्वमान्य नेते आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत निवासी मूक-बधिर विद्यालय, जत येथे फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शरद पवार साहेबांचे संपूर्ण सार्वजनिक व राजकीय आयुष्य हे शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, वंचित घटक यांच्या हक्कासाठी लढणारे व समतोल नेतृत्वाचे द्योतक राहिले आहे. कृषी, सहकार, अर्थव्यवस्था व सामाजिक विकास क्षेत्रात त्यांनी उभा केलेला भक्कम पाया आजही देशासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
या उपक्रमात जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब, कार्याध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण, प्रतापराव शिंदे, बी. आर. पाटील, अमोल कराडे, सागर लट्टी, सदा कोळेकर, अमोल शिंदे, मीनाक्षीताई अक्की, सुवर्णा अलगुर, भारती चव्हाण इत्यादी प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमानिमित्त उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शरद पवार साहेबांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम समाजाप्रती सकारात्मक संदेश देणारा ठरल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.


