yuva MAharashtra यल्लम्मा देवी यात्रेनिमित्त जत येथे खिलार जनावरे व शेतीमालाचे प्रदर्शन

यल्लम्मा देवी यात्रेनिमित्त जत येथे खिलार जनावरे व शेतीमालाचे प्रदर्शन

जत वार्ता न्यूज
By -

 


जतवार्ता न्यूज नेटवर्क;

     सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली आणि श्रीमंत विजयसिंहराजे दुध्यम बाजार आवार, जत तसेच श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठान, जत यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याहीवर्षी ‘श्री यल्लम्मादेवी यात्रे’ निमित्त खिलार जनावरे व शेतीमालाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

    यात्रेच्या पारंपरिक वैभवाला आधुनिक स्वरूपात जपत, हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात होणार असून पशुपालक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित असल्याचे मत सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती व यात्रा कमिटीच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

प्रदर्शनाचे प्रमुख दिवस पुढीलप्रमाणे:

सोमवार, १५ डिसेंबर २०२४ – गंध ओटी या दिवशी सकाळी ११ वा. प्रदर्शनाचे उद्घाटन

मंगळवार, १६ डिसेंबर २०२४ – श्रीस नैवेद्य, सायं. ४ वा. खिलार जनावरे व शेतीमालाची बोली

बुधवार, १७ डिसेंबर २०२४ – श्रीचे किचाचा दिवस, सकाळी ८ वा. शेतीमाल व जनावरांची निवड; सायं. ४ वा. प्रदर्शन बक्षीस समारंभ

    या प्रदर्शनात विविध प्रकारची खिलार जनावरे, प्रगत शेतीमाल, आधुनिक कृषी साधने व ग्रामीण बाजारातील विविध वस्तूंचा समावेश असून परिसरातील शेतकरी व नागरिकांसाठी ही महत्त्वाची संधी ठरणार आहे.

    आयोजकांनी शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेचा आणि प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.