yuva MAharashtra 'स्वच्छ जल, स्वच्छ मन’ निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ

'स्वच्छ जल, स्वच्छ मन’ निरंकारी सद्गुरुंच्या शुभहस्ते ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ

जत वार्ता न्यूज
By -

पाण्याच्या स्वच्छतेबरोबरच, मनाची स्वच्छताही आवश्यक- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या शुभहस्ते आज सकाळी 8.00 वाजता ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ यमुना नदीच्या छट घाटावर (आय.टी.ओ.) येथून करण्यात आला. 
 याबरोबरच देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासकीय प्रदेशांतील 730 शहरांमध्ये हे अभियान एकाच वेळी सुरु करण्यात आले.   
बाबा हरदेवसिंहजी यांच्या शिकवणूकीतून प्रेरणा घेत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य निर्देशनानुसार या ‘अमृत परियोजने’चे आयोजन करण्यात आले.  
याप्रसंगी संत निरंकारी मिशनचे समस्त अधिकारीगण, केन्द्रीय एवं राज्य सरकारमधील मंत्री, मान्यवर अतिथि तसेच हजारोंच्या संख्येने निरंकारी स्वयंसेवक आणि सेवादलचे सदस्य या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मिशनच्या वेबसाईटवरुन करण्यात आले ज्याचा लाभ देशविदेशातील निरंकारी भक्तगणांनी घेतला.  
   या परियोजनेचा शुभारंभ करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी पाण्याचे अनन्यसाधारण महत्व समजावून सांगितले ईश्वराने आपल्याला हे अमृतरुपी जल दिले आहे त्याचा निर्मळ स्वरुपात सांभाळ करणे हे आपले परम कर्तव्य असल्याचे सांगितले. पाणी निर्मळ होण्याबरोबरच मनेही निर्मळ होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करुन सद्गुरु माताजी म्हणाल्या, की आपण संतांसारखे जीवन जगून परोपकाराचे कार्य करत राहायचे आहे.
संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री.जोगिन्दर सुखीजाजी यांनी या अभियान विषयी सविस्तर माहिती दिली. 
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून देशभरातील विविध जलाशयांच्या बाबतीत देण्यात आलेल्या निर्देशांचे यथोचित पालन करण्यात आले. यामध्ये रेड झोन सर्वांसाठी पूर्णपणे वर्जित ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे मुख्य स्थळ यलो झोन होता तर ग्रीन झोनमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव महिला व बालकांना प्रवेश देण्यात आला होता.  
         या अभियान अंतर्गत जत मध्येही जत नगरपरिषदेची मोठी उंच पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्र परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली यामध्ये टाकी परिसर क्षेत्रामध्ये पडलेला प्लास्टिक कचरा,निरुपयोगी पदार्थ,टी सी एल वापराची मोकळी पोती,अनावश्यक काटेरी झुडपे इत्यादीचा निपटारा करून टाकी व परिसर स्वच्छ करण्यात आला या अभियान दरम्यान जत नगरपरिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांनी भेट देऊन राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले एवढ्या निरपेक्ष भावनेने हे निरंकारी भक्त सेवा कसे करतात या प्रश्नाचे निराकारण करताना स्थानिक मुखी म्हणाले की निरंकारी सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या शिकवणीमुळेच हे शक्य आहे असे मत व्यक्त केले या अभियानास जत तालुक्यातील निरंकारी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम सांगली जिल्हा अंतर्गत सांगली खानापुर व शिराळा सेक्टर अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक शाखामध्ये राबविण्यात आला सांगली व मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा नदी घाट सांगली येथेही स्वच्छता करण्यात आली 
या परियोजनेमध्ये जास्तीत जास्तीत युवावर्गाचा सक्रिय सहभाग होता. कार्यक्रमामध्ये केवळ पर्यावरणपूरक उपकरणांचाच वापर करण्यात आला. प्लास्टिक बॉटल किंवा थर्माकॉल इत्यादिंच्या वस्तू पूर्णपणे प्रतिबंधित होत्या.
Tags: