जतवार्ता न्यूज नेटवर्क;
कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे आरेवाडी येथील बिरोबा बन शेजारील गायरानमधील प्रस्तावित मैलागाळ व्यवस्थापन प्रकल्प करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रशासकीय मान्यदा दिली होती ती रद्द करण्यासाठी निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने जिल्हा परिषदेसमोर धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे आरेवाडी येथील बिरोबा बन शेजारील गायरनातील प्रस्तावित मैला प्रकल्प रद्द करीत असल्याचे लेखी पत्र जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी किरण सायमोटे यांनी दिल्याने आमरण उपोषण स्थगित केल्याचे धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी सांगितले. यामुळे बिरोबा भक्तांनी आनंद व्यक्त केला. यावेळी तानाजी कटरे, तानाजी व्हनमाने, अशोक गोरड आदी उपस्थित होते.

