yuva MAharashtra युवा प्रशिक्षणार्थींचा प्रश्न मार्गी लावणारच- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे|तुकाराम बाबांसह युवा प्रशिक्षणार्थीनी घेतली नागपुरात भेट

युवा प्रशिक्षणार्थींचा प्रश्न मार्गी लावणारच- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे|तुकाराम बाबांसह युवा प्रशिक्षणार्थीनी घेतली नागपुरात भेट

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
      राज्यातील एक लाख ३४ हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीवर बेरोजगारांची कुऱ्हाड कोसळली आहे. याबाबत आपणास नेमके काय करता येईल ते निश्चित करू व राज्यातील युवा प्रशिक्षणार्थीना न्याय देवून प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा प्रशिक्षणार्थीच्या शिष्टमंडळाला दिली.
     चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या ठिकाणी युवा प्रशिक्षणार्थी संघटनेसमवेत चक्क रस्त्यावर झोपत अनोखे चॉकलेट आंदोलन केले. अधिवेशनावर चॉकलेट मोर्चा आंदोलन केले. यापूर्वी ही योजना पुन्हा सुरू व्हावी यासाठी तुकाराम बाबा यांनी मुंबई, सांगली, देहू, नाशिकसह राज्यभर आंदोलन केले होते. शासन लाडक्या भावाला विचारायला तयार नाही. लहान मुलांना जसे चॉकलेट देवून वेड्यात काढले जाते तसेच राज्यातील एक लाख ३४ हजार तरुणांना या शासनाने वेड्यात काढले आहे. या बेरोजगार तरुणांचा विचार करावा अन्यथा राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा तुकाराम बाबा यांनी दिला होता. 
     हिवाळी अधिवेशन दरम्यान युवा प्रशिक्षणार्थीनी हभप तुकाराम बाबा यांच्यासह जोरदार चॉकलेट आंदोलन व मोर्चा काढत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनास राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी या योजनेचे जनक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची भेट घालून देण्याचे आश्वासन तुकाराम बाबा यांना दिले होते. गुरुवारी तुकाराम बाबा यांच्यासह बालाजी चाकूरकर व प्रशिक्षणार्थी यांनी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिष्टमंडळाला युवा प्रशिक्षणार्थींच्या बाबतीत ठोस निर्णय घेवू, निधीची तरतूद करू अशी ग्वाही दिली.

युवा प्रशिक्षणार्थीच्या आशा पल्लवित- तुकाराम बाबा
     राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली असून आमच्या आशा पल्लवीत झाल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.