yuva MAharashtra जीपच्या धडकेत दोघेजण जखमी; जत पोलिसात गुन्हा दाखल

जीपच्या धडकेत दोघेजण जखमी; जत पोलिसात गुन्हा दाखल

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क :- जत येथील महाराणा प्रताप चौकातील पेट्रोल पंपासमोर जीपने दुचाकीला धडक दिल्याने दोघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी सात वाजता घडला. या प्रकरणी जीप चालकावर जत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
       जत येथील अमित तानाजी पाटील हे दुचाकीवरून (एमएच १०- डीयू ने १७८१) पुतण्या गणेश व पुतणी स्वाती यांच्यासह पेट्रोल भरण्याकरिता बस स्थानकासमोरील पंपावर जात होते. त्याच वेळी भरधाव वेगात आलेल्या जीपने (क्र. केए २२ पी. ५१४६) दुचाकीला धडक दिली. यात गणेश व स्वाती गंभीर जखमी झाले.
Tags: