yuva MAharashtra संत निरंकारी मंडळाचे वतीने जत येथे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन

संत निरंकारी मंडळाचे वतीने जत येथे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन

जत वार्ता न्यूज
By -
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- संत निरंकारी चॅरिटेबल फौडेंशन  दिल्ली शाखा जत येथे रविवार दिनांक २५ जुन २०२३ रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत बचत भवन जत येथे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जतचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे तसेच निरंकारी मंडळाचे क्षेत्रिय संचालक जगन्नाथजी निकाळजे सांगली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. 
       रक्त संकलन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मीरज व सांगली सिव्हिल हे उपस्थितीत राहणार आहेत. विज्ञानाने सर्व काही प्रगती केली परंतु विज्ञानाला रक्त बनविता आले नाही. रक्तदान केलेने आपण एखाद्याला जिवनदान देऊ शकतो रक्तदानासारखे श्रेष्ठ असे कोणतेही दान नाही तरी या पवित्र कार्यास मोठ्या संख्येने योगदान द्यावे असे आवाहन जत शाखेचे मुखी जोतिबा गोरे यांनी केले आहे.
Tags: