जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत महावितरण कंपनीकडून शहरात पुरवला जाणार वीजपुरवठा हा वारंवार खंडित केला जातो, तसेच नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज खंडित केली जाते. त्यामुळे नागरीक व व्यापरांमडून महावितरण कंपनी विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीचे निवेदन बसपाचे जत शहर उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे यांनी महावितरणचे अभियंता यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये मागील २ महिन्यापासून आपल्या म.रा.वि.वि.कंपनी यांच्याकडून वारंवार ऐन कडक उन्हाळाच्या दिवसात व इतर वेळी वारंवार विद्युत पुरवठा खंडीत केली जात आहे. त्यामुळे जत शहरातील नागरीकांना आतोनात त्रास होत आहे. तसेच शाळा व महाविद्यालयीन सुट्टी असल्यामुळे शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनीनी कॉप्युटर कोर्स सुरु केले असल्याने विद्युत पुरवठा खंडीत केल्याने विद्यार्थ्यांचे कॉप्युटर क्लास बुडत आहेत व त्याचे आर्थिक व शैक्षिणीक नुकसान होत आहे. तसेच ग्रामीन भागातील नागरीक ऑनलाईन कामासाठी जत येथे आले असताना वीज नसल्यामुळे त्यांचे हि गैरसोई होत आहे. ऑनलाईन सेन्टर, ऑफीसचे कामे होत , नाही. लहान मुलांचे व वडीलधाऱ्या लोकांचे उष्माघातामुळे जीवीतास त्रास होत आहे. आपल्या कार्यालयाकडून वेळेत वीज बील वसूली करुन देखील वारंवार विद्युत खंडीत केल्याने विद्युत अभावी होणाऱ्या नुकसान भरपाईस कोण जबाबदार राहणार आहे.? तसेच जत शहरातील व्यापारी व नागारीकांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तरी आपल्या म.रा.वि.वि.कंपनी शाखा जत यांच्याकडून पूर्व कल्पना देने आवश्यक आहे. येणाऱ्या आवकाळी पाऊसामुळे आपल्या म.रा.वि.वि. कंपनी शाखा जत यांच्याकडून वेळेत विद्युत लाईनची देखभाल दुरुस्ती करुन घेण्यात यावी. जर आपल्या कार्यालयाकडून वारंवार वीज खंडीत झाल्यास बहुजन समाज पार्टी कडून तिव्र निषेध आदोलन करण्यात येईल.

