जतवार्ता न्यूज नेटवर्क;
काँग्रेस पक्षामध्ये गेली अनेक दिवस प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडणारे व आमदार सावंत यांचे विश्वासू जत येथील शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेस पक्ष्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमदार सावंत यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाचे काम मी प्रामाणिकपणे पार पाडेण असे मत तंगडी यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाबासाहेब तात्या कोडग, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, येळदरीचे सरपंच राम सरगर, दानम्मा देवी दूध सेवा संघाचे संचालक रावसाहेब मंगसुळी, माजी नगरसेवक परशुराम मोरे, भूपेंद्र कांबळे, जत शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश जाधव, प्रताप कोडग आदीजण उपस्थित होते.

