yuva MAharashtra जत येथे स्वानंद वृद्ध सेवा केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन

जत येथे स्वानंद वृद्ध सेवा केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन

जत वार्ता न्यूज
By -

 


जतवार्ता न्यूज नेटवर्क;

     गंगाई सामाजिक सेवाभावी संस्था जत यांच्या पुढाकारातून जत येथील अबाल वृद्धांसाठी स्वानंद वृद्ध सेवा केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वृद्ध सेवा केंद्राचे संचालक मंडळी यांनी दिली. सोमवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जत विजापूर राष्ट्रीय महामार्गालगत डॉ. राऊत यांच्या घरासमोर सेवा केंद्राचे उद्घाटन होणार आहे. या सेवा केंद्राचे उद्घाटन प्रमुख संचालक शरद पाटील व जलहरी शबनक वृद्धाश्रमाचे संस्थापक राजेश गडकरी यांच्या शुभहस्ते होणार आहे.

     यावेळी प्रमोद पोतनीस सर, श्रीपाद जोशी सर, कु. प्रतिभा गुरव, मुराद पटेल हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. हे सेवा केंद्र सुरू करण्यासाठी नरेंद्र जमगे, भारत गायकवाड, विष्णू कोष्टी, अजित शिंदे, अनिल देशपांडे, अनुराग नकाते आदींनी परिश्रम घेतले आहेत.