yuva MAharashtra जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

जत वार्ता न्यूज
By -


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    जत येथील सामाजिक उन्नती व अपंग निराधार पुनर्वसन विकास संस्था आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २६ सप्टेंबर रोजी जत येथील साईप्रकाश मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिर आयोजित केल्याची माहिती रिपाइं आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजय कांबळे यांनी दिली.
    प्रमुख पाहुणे म्हणून जतचे प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी कुंदन शिनगारे, जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, संखच्या अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास, जतचे नायब तहसीलदार पंडित कोळी, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, पोलिस निरीक्षक सूरज बिजली, एल. ए. क्षीरसागर, एन. एस. सावंत, सुनील मंडले, योगेश सूर्यवंशी, शंकर कुऱ्हाडे उपस्थित राहणार आहेत.