yuva MAharashtra वृत्तपत्र विक्रेता व वाचन प्रेरणादिनानिमित्त जत येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम याना अभिवादन

वृत्तपत्र विक्रेता व वाचन प्रेरणादिनानिमित्त जत येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम याना अभिवादन

जत वार्ता न्यूज
By -

 


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    वृत्तपत्र विक्रेता व वाचन प्रेरणादिनानिमित्त भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना वृत्तपत्र विक्रेते, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून विनम्र अभिवादन करण्यात आले.
    देशभर सर्वत्र भारताचे दिवंगत माजी  राष्ट्रपती व मिसाईल मॅन डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणादिनाचे आयोजन करण्यात आले होते.
    जत येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात असलेल्या वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब पवार यांच्या सदगुरू शाॅपी व पेपर स्टाॅल या ठिकाणी भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस जेष्ठ पत्रकार श्रीकृष्ण पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 
    यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब पवार, दै.तरूण भारतचे जत तालुका प्रतिनिधी किरण जाधव, केसरीचे जत तालुका प्रतिनिधी प्रदीप कुलकर्णी, सामाजीक कार्यकर्ते विक्रम ढोणे, महांतेश डोणूर, अशपाक हुजरे, अप्पय्या स्वामी, विलास बामणे, अब्दुल मसरगुप्पी सुनिल कोळी, गोरख पवार आदी उपस्थित होते.
Tags: