जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जतयेथे सालाबादप्रमाणे विजयादशमी,दसरा सण मोठ्या उत्साहात पार पडला. येथील श्रीराम मंदिरापासून पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखीसोबत जतचे संस्थानीक व श्री.यल्लमादेवी प्रतिष्ठान जत चे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे ,युवराज श्रीमंत अनिरुद्ध राजे व शिवांश राजे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
ही पालखी जत येथील वेशीतून प्रवेश करून ती शिमोल्लंघनाचे ठिकाणी आल्यानंतर पालखी प्रदक्षीणा झाल्या. यानंतर संस्थानचे पुरोहीत रमेश पुरोहीत यांनी विधिवत शमीच्या ढीगाची पूजा केली. त्यानंतर श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांनी आरती केल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सोने लुटण्यासाठी नागरीक एकमेकांच्यावर तूटून पडले होते.
यानंतर श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांनी सोने वाटप करीत सर्व उपस्थितांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उध्दव ठाकरे गटाचे नेते श्री.दिनकर पतंगे ,मोहन चव्हाण, कैलास आदाटे ,पापा सनदी,गुरू बिज्जरगी,चंद्रसेन माने-पाटील, संग्राम राजेशिर्के,प्रा.कुमार इंगळे,मोहन माने-पाटील, पोलीस पाटील मदन माने-पाटील, अमर जाधव, डाॅ.देवानंद वाघ आदींसह हजारो नागरिक उपस्थित होते.