yuva MAharashtra डफळापूर ते एकुंडी रस्त्याची दुर्दशा प्रवाशांचे हाल; तातडीने दुरुस्तीची मागणी; बसवराज पाटील

डफळापूर ते एकुंडी रस्त्याची दुर्दशा प्रवाशांचे हाल; तातडीने दुरुस्तीची मागणी; बसवराज पाटील

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    डफळापूर ते मिरवाड, जिरग्याळ मार्गे एकुंडी दरम्यानचा प्रमुख राज्य मार्ग पूर्णपणे उखडला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच पावसामुळे अधिकच बिकट झालेली अवस्था यामुळे प्रवाशांना प्राण धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
    या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी संबंधित विभागाकडे केली आहे. हा रस्ता सामान्य जनतेच्या रोजच्या वापराचा असून त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जनतेच्या जिवाशी खेळ सुरू आहे.
तसेच पाटील यानी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्याचे त्वरित सर्वेक्षण करून काम हाती घेण्याचे आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी केली आहे.
    जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी जनतेतूनही होत आहे. "जनतेच्या सुरक्षेशी कुठलिही तडजोड सहन केली जाणार नाही, प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी!"