yuva MAharashtra जत येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संपर्क कार्यालय|पक्षप्रमुख विनय कोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन | त्याअनुषंगाने तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद

जत येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संपर्क कार्यालय|पक्षप्रमुख विनय कोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन | त्याअनुषंगाने तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद

जत वार्ता न्यूज
By -

 


जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    शहरात जनसुराज्य शक्ती पक्षाचे नूतन कार्यालय उद्घाटन दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला पक्षप्रमुख आमदार डॉ. विनय कोरे तसेच प्रदेशाध्यक्ष समित कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्या अनुषंगाने तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी गुड्डापूर येथे श्री दानम्मादेवीचे दर्शन घेऊन जत तालुक्यातील महत्त्वाच्या गावांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
    या दौऱ्यात जत पूर्वभाग वळसंग, कोळगेरी, व्हसपेठ, माडग्याळ, आसंगी, संख, गुड्डापूर, सोरडी, दरिकुण्णूर आणि मुचंडी या गावांचा समावेश होता. या भेटीदरम्यान मोठ्या संख्येने ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी उत्साहात स्वागत करून कार्यक्रम यशस्वी करण्याचा संकल्प केला आहे.
    यावेळी बोलताना पाटील  म्हणाले की, जनसुराज्य शक्ती पक्षाचा विस्तार हा प्रत्येक कार्यकर्त्याच्या कष्टांमुळे आणि जनतेच्या विश्वासामुळे शक्य झाला आहे. जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांचे सोडवणूक करण्यासाठी हे कार्यालय जनतेचे खरे केंद्रबिंदू ठरेल. या उद्घाटन कार्यक्रमात प्रत्येक गावातील जनतेने उपस्थित राहून आपले बळ दाखवावे.
    या दौऱ्यात पक्षाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण तालुक्यात 28 सप्टेंबर रोजीच्या उद्घाटन कार्यक्रमाला ऐतिहासिक यश मिळावे यासाठी जनसंपर्क मोहीम जोमात राबवली जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.