yuva MAharashtra सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक पूर्ण तकदीने लढविण्याचा निर्धार ; श्रीशैल चौगुले यांना वाढता पाठिंबा

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक पूर्ण तकदीने लढविण्याचा निर्धार ; श्रीशैल चौगुले यांना वाढता पाठिंबा

जत वार्ता न्यूज
By -

 


जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत तालुक्यातील माडग्याळ येथील विकास सोसायटीचे संचालक सदन शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल सिद्राम चौगुले यांना सर्व घरातून वाढता पाठिंबा मिळत असून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक पूर्ण ताकतीने लढविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
      सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माडग्याळ येथील श्रीशैल चौगुले यांनी भटक्या विमुक्त गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे,  जय मल्हार फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत चौगुले, जत येथील युवा नेते डॉ. प्रवीण वाघमोडे,  सामाजिक कार्यकर्ते प्रमोद ऐवळे तसेच जाडरबोबलाद येथील नेते विठ्ठल पुजारी यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.
      जत तालुक्यातील शेतकरी यांना बाजार समितीच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी व बाजार समित्या सक्षम बनवण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे मत यावेळी श्रीशैल चौगुले यांनी व्यक्त केले आहे.
Tags: