yuva MAharashtra संख येथे सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण स्थगित; चर्चेनंतर उपोषणकर्त्यांचा समाधानकारक निर्णय

संख येथे सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण स्थगित; चर्चेनंतर उपोषणकर्त्यांचा समाधानकारक निर्णय

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     आमदार गोपीचंद पडळकर यांनी संख येथे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणास आज भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या, भावना आणि अडचणी सविस्तरपणे जाणून घेण्यात आल्या. उपोषणकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासनदरबारी पाठपुरावा केला जाईल, असे ठोस आश्वासन यावेळी देण्यात आले.
     उपोषणकर्त्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. संवादादरम्यान उपोषणकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन लोकशाही मार्गाने प्रश्न सोडवण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली. या सकारात्मक चर्चेनंतर उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त करत आपले बेमुदत आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
     यावेळी लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवून जनतेच्या न्याय्य मागण्यांना योग्य न्याय मिळावा, यासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला. जनतेच्या प्रश्नांसाठी संवाद, चर्चा आणि सहकार्याच्या माध्यमातूनच मार्ग काढला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
     या प्रसंगी शिवसेनेचे नेते संजय बापू, डॉ. रविंद्र आरळी सर, भाजप शहराध्यक्ष अण्णा भिसे तसेच अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याची गरज व्यक्त करत चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे महत्त्व अधोरेखित केले.