जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत येथील उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन, जत संचलित सिद्धार्थ पॉलीटेकनिक मध्ये प्रथम व द्वितीय वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि इंजिनियरस डे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एम.एस.ई.डी.सी.एल सब डिव्हिजन जत चे असिस्टंट इंजिनियर शिवाजी गावडे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गावडे म्हणाले, समाज्यामध्ये सध्या इंजिनियर चे खूप मोठे योगदान आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये इंजिनियर आपल्या कामाचा ठसा उमठवत आहेत. त्यामुळे आपण आपले प्रथम ध्येय ठरवा. मला काय करायचे आहे? मला काय बनायचे आहे? ते पूर्ण करण्यासाठी आपण सोशल मीडिया अँपचा गरजे पेक्षा जास्त वापर न करता अभ्यासात लक्ष देऊन आपले लक्ष, ध्येय साध्य केले पाहिजे. तरच आपण यशस्वी व्हाल. यावेळी सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडीचे अध्यक्ष डॉ.सौ. वैशाली सनमडीकर व संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी डॉ. कैलास सनमडीकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात दर्जेदार शिक्षण त्यांच्या गावाजवळ मिळावे व त्यांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्या या उद्देश्याने सिद्धार्थ पॉलीटेकनिक कॉलेज सुरु केले आहे. त्यासाठी संस्था सदैव्य विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील असेल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी, त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात कॉलेज संस्था नेहमी मार्गदर्शन मदत करीत असणार आहे. त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असेही आवाहन केले. त्यांनी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि इंजिनियर डे च्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन द्वितीय आणि तृतीय वर्ष्यातील विद्यार्थ्यांनी केले. यावेळी एसएससी व एचएससी बोर्ड परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. सिद्धी चव्हाण आणि कु. मानसी गुरव यांनी केले. आभार प्रदर्शना प्रकाश कारकल यांनी केले. या कार्यक्रमास कॉलेजच्या प्राचार्या रेणुका वागोली, नॉन अकेडेमिक इन्चार्ज संजय बाबर, विभाग प्रमुख हरीश साळुंखे, इरापा पुजारी, करण रजपूत, सौरभ शिंदे, प्रकाश कारकल, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

