श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना व श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून कायम मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून समाजसेवेसाठी तत्पर असणारे. राष्ट्रीय संत गाडगेबाबा, वैराग्यसंपन्न बागडेबाबा यांच्या विचाराचा वारसा समर्थपणे चालविणारे हभप तुकाराम बाबा महाराज हे मागील १७ वर्षांपासून जतच्या प्रसिद्ध श्री यलम्मा देवी यात्रा काळात खास मुक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात. दुष्काळ, कोरोना, महापूर असो की यात्रा, जत्रा त्या ठिकाणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा महाराज हे नेहमीच आपले कर्तव्य पार पाडतात.
यंदा १८ व्या वर्षीही पाण्याचे तीन टँकर देत तुकाराम बाबांची ही अविरत जनसेवा सुरूच आहे. यंदा या कार्याचा शुभारंभ माडग्याळ येथून तुकाराम बाबा महाराज , ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी, जत पूर्व भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष रंजना हाके, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हा सरचिटणीस कामाण्णा बंडगर यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले.
यावेळी लिंबाजी माळी, निंगाप्पा कोरे, जेटलिंग कोरे, व्हणाप्पा माळी, प्रा विजय हाके, बचत गटाच्या प्रभाग संघ अध्यक्षा कविता नेताजी खरात, पत्रकार बांधव, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
तुकाराम बाबांनी दुष्काळातही दिली साथ- सौ रंजना हाके;निरपेक्ष भावनेने सामाजिक विचारांचा वारसा जपणारे तुकाराम बाबा यांनी जतच्या श्री यलम्मा यात्रेतही ते मागील १७ वर्षांपासून मुक्या जिवाला मोफत पाणी पुरवठा करत आहेत. जतच्या यात्रेवर ज्याज्यावेळी दुष्काळाची गडद छाया पसरलेली असते त्या त्यावेळी तुकाराम बाबा हे कायम मदतीला धावून येतात. त्याच्या कार्याला सलाम असल्याची भावना जत पूर्व महिला मोर्चा अध्यक्ष रंजना हाके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
पाण्यासाठी बाबांनी घातले देवीला साकडे;जतचा दुष्काळ जर कायमचा हटायचा असेल तर जतच्या ६५ गावांसाठी वरदान ठरणारी विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम गतीने होवू दे, मायथळपासून व्हसपेठ, गुडडापूर, संख तलावात म्हैसाळचे पाणी नेण्याचे काम गतीने सुरू आहे. महिन्याभरात हे काम पूर्ण होऊ दे, जतचा दुष्काळ कायम हटू दे असे साकडे श्री यलम्मा देवीला घातल्याचे हभप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


