जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भारतीय जनता पक्षाचे डॉ. रवींद्र अरळी यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवत नगरपरिषदेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
नगरपरिषदेच्या एकूण जागांपैकी भाजपने ११ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला ८ जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा मिळाल्या. याशिवाय १ जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
जत नगरपरिषद निवडणुकीच्या या निकालामुळे आगामी स्थानिक राजकारणात भाजपची भूमिका अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.जत शहरातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो. हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे. जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचा माझा प्रयत्न राहील. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि युवकांसाठी रोजगारनिर्मिती या बाबींना प्राधान्य देण्यात येईल. सर्व पक्षांना सोबत घेऊन जत शहराचा विकास साधू.- डॉ. रवींद्र अरळी
विजयी उमेदवारांची यादी व पडलेली एकूण मते:-
डॉ. रविंद्र शिवशंकर आरळी भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष - 9112
प्रभाग क्र-1-अ
राजकुमार कल्लाप्पा साळे (भारतीय जनता पार्टी) - 993
प्रभाग क्र-1- ब
सौ. लक्ष्मीबाई आण्णाप्पा कैकाडी (भारतीय जनता पार्टी) - 860
प्रभाग क्र-2-अ
प्रमोद सदाशिव हिरवे (भारतीय जनता पार्टी)- 626
प्रभाग क्र-2- ब
तंगडी वीणा शंकर (भारतीय जनता पार्टी) - 625
प्रभाग क्र-3-अ
पट्टणशेट्टी सीमा संतोष(भारतीय जनता पार्टी) - 793
प्रभाग क्र-3-ब
ऐवाळे गौतम रामचंद्र (भारतीय जनता पार्टी) - 874
प्रभाग क्र-4-अ
संतोष उर्फ भूपेंद्र कुमार कांबळे (इंडियन नॅशनल कॉग्रेस) - 952
प्रभाग क्र-4-ब
सौ. निलाबाई कृष्णा कोळी (इंडियन नॅशनल कॉग्रेस) - 1091
प्रभाग क्र-5-अ
यादव प्रणिता गजानन (उर्फ) राजु (भारतीय जनता पार्टी) - 749
प्रभाग क्र-5-ब
गवंडी इम्रान इकबाल (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी) - 744
प्रभाग क्र-6-अ
सोनुले संगीता अविनाश (भारतीय जनता पार्टी) -972
प्रभाग क्र-6-ब
ताड विक्रम शिवाजी (भारतीय जनता पार्टी) - 890
प्रभाग क्र-7-अ
सौ. अर्चना बाजी केंगार (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी) - 705
प्रभाग क्र-7-ब
स्वप्निल सुरेश शिंदे (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी) - 695
प्रभाग क्र-8-अ
विकास वसंत माने (इंडियन नॅशनल कॉग्रेस) - 760
प्रभाग क्र-8-ब
सौ. सुप्रिया योगेश बामणे (इंडियन नॅशनल कॉग्रेस) - 744
प्रभाग क्र-9-अ
जमखंडी शबाना मिरासाहेब (इंडियन नॅशनल कॉग्रेस) - 610
प्रभाग क्र-9-ब
कुलकर्णी मोहन सुभाष (इंडियन नॅशनल कॉग्रेस) - 677
प्रभाग क्र-10-अ
फिरोज म. इसाक नदाफ (अपक्ष) - 467
प्रभाग क्र-10-ब
अनुसया प्रकाश माने (इंडियन नॅशनल कॉग्रेस) - 671
प्रभाग क्र-11-अ
काजल राहुल काळे (इंडियन नॅशनल कॉग्रेस) - 1237
प्रभाग क्र-11-ब
नंदिनी सोमशेखर मठपती (भारतीय जनता पार्टी) - 1212
प्रभाग क्र-11-क
भिसे मिथुन रमेश (भारतीय जनता पार्टी) - 1209



