जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल या संकुलात विजापूर - गुहागर या राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या तळमजल्यावरील दुकानात मुचंडी येथील श्री. दयानंद व शिवानंद सत्तीगिरी या बंधूनी ऍक्वा वाटर प्युरिफाय चे दुकान सुरु केले असून सत्तीगिरी बंधू गेल्या अनेक वर्षांपासून वाटर प्युरिफाय मशीन विक्री व सेवा देण्याचे अगदी प्रामाणिकपणे काम करतात.
कोणाचे वॉटर प्युरिफाय मशीन खराब झाले, बिघडले तर सत्तीगिरी बंधू हे कॉल करताच हजर होतात व तात्काळ सेवा देतात त्यामुळे या दयानंद व शिवानंद बंधूनी या वॉटर प्युरिफाय व्यवसायात आपले नाव कमविले आहे.
आज त्यांच्या या दुकानाचे स्वामींचे हस्ते विधिवत पूजा करून कार्तिक याच्या हस्ते फीत कापून उदघाट्न करण्यात आले. सत्तीगिरी बंधूनी, अक्वा प्युरिफाय मशीन त्याच प्रमाणे वॉटर प्युरिफाय मशीनचे सर्व प्रकारचे पार्ट विक्री साठी ठेवले असून सत्तीगिरी यांनी जत शहर वासियांची वॉटर प्युरिफाय विक्री व दुरुस्ती सेवेच्या माध्यमातून गरज पुर्ण केली आहे.

