जतवार्ता न्यूज नेटवर्क;
संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन शाखा सांगली यांचे वतीने सांगलवाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 149 नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आला. यामध्ये हृदयरोग, कार्डिओग्राम, मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी यासारख्या विविध आजारांवर तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आला.
हुबळी येथील सुप्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ.पुरुषोत्तम आरोरा यांचे मार्गदर्शनाखाली डॉ भाग्यश्री बाबर, चंद्रकांत लिगाडे, अनिल तावरे, तुकाराम खोत, पांडुरंग नाकार्डे, डॉ. आदित्य, प्रवीण माळी, स्मितल कसबेकर व इतर सहकारी सदस्य यांनी तपासणी मध्ये योगदान दिले.
या आरोग्य शिबिरा प्रसंगी डॉ.आरोरा आणि त्यांचेबरोबर झोनल इन्चार्ज नंदकुमार झांबरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, संत निरंकारी मंडळ हे आध्यात्मिक जागृती बरोबर विविध सामाजिक उपक्रम राबवुन मानवाची सेवा करीत आहेत. यामध्ये रक्तदान शिबीर, आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, स्वच्छ जल स्वच्छ मन अंतर्गत जलाशयाची स्वच्छता, सामुहिक विवाह,नवृक्षारोपण, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य पुरविणे यासारखे विविध उपक्रम राबवुन मानवतेची सेवा करुन विश्वशांतीचा संदेश देत आहेत. दिल्ली येथे १ हजार बेडचे 'हेल्थ सिटी' या नावाने हॉस्पिटल उभारण्याचे कामकाज सुरू आहे. यामध्ये रुग्णांचे मोफत उपचार करण्यात येणार आहेत. दिनांक २४ ते २७ जानेवारी २०२६ रोजी सांगलवाडी येथे होणाऱ्या महाराष्ट्र निरंकारी संत समागम मध्येही हॉस्पिटलची सेवा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन सांगली संयोजक जालिंदर जाधव व निरंकारी मंडळाचे सेवादल सदस्य यांनी केले.

