जतवार्ता न्यूज नेटवर्क;
माडग्याळ तालुका व्हावा या मागणीसाठी सुरू असलेल्या चक्रीय उपोषणाला जत तालुका काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठिंबा देत असल्याचे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी सांगितले. जत तालुक्याच्या पूर्व भागात माडग्याळ हेच मध्यभागी असून तालुका करण्यास काही हरकत नाही असे मत माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी उपोषण स्थळी व्यक्त केले. यावेळी बाबासाहेब कोडग, गणी मुल्ला सोसायटी चेअरमन प्रदीप करगणिकर यांच्यासह माडग्याळ गावातील परिसराती नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमवार चक्री उपोषणचा सहावा दिवस होता. माजी आमदार विक्रम सावंत यांनी उपोषण स्थळी भेट दिली. प्रथम बोलताना डॉ. श्रीनिवास कुलकर्णी व सोसायटी चेअरमन प्रदीप करगणिकर यांनी माडग्याळ तालुकाच का व्हावा याची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले जत पश्चिम भाग हा १८ ते २० किमी अंतरावर आहे. जत पूर्व भाग हा ८५ किमी चा आहे. त्यामुळे जत पासून २५ किमी वर माडग्याळ आहे. माडग्याळ पासून २५ किमी परिसराचा असल्यामुळे तालुक्यासाठी योग्य आहे. तसेच उमदी व संख ह्या गावांपासून मात्र १० ते १५ किमी अंतरावर कर्नाटक सीमा असल्याने ते तालुक्यासाठी धोकादायक आहे. माडग्याळमध्ये पाहिजे त्या सुविधा असून तालुका करण्यास काहीच हरकत नाही.
जत पूर्व भागातील सोयीसाठी अप्पर तहसील झाले परंतु ते सोयीस्कर होण्यापेक्षा गैरसोयचं झाले आहे. काहीच कामे होत नाहीत त्यामुळे सर्वाना सोयीस्कर असलेले माडग्याळच तालुका केल पाहिजे असे माजी आमदार विक्रम सावंत म्हणाले. जत तालुका एवढा मोठा आहे की दोन तालुके करण्यापेक्षा तीन तालुके करा असे ते म्हणाले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष महादेव पाटील व बाबासाहेब कोडग यांनी जत तालुका काँग्रेस कमिटी तर्फे माडग्याळ तालुका साठी जाहीर पाठिंबा दिला. ते म्हणाले, सांगली जिल्ह्यात 8 तालुके होते. परत 10 झाले परंतु जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका जत असताना प्रथम विभाजन केले पाहिजे होते मात्र जतचे विभाजन केले नाही. सध्याचे आमदारांनी लक्ष घालून तालुकाचा प्रश्न मार्गी लावावा असे आव्हान त्यांनी केले.
आजपासून आमरण उपोषण;मागील सहा दिवसांपासून माडग्याळ मध्ये चक्रीय उपोषण सुरू असून अद्याप शासनाकडून व विद्यमान आमदार यांच्याकडून कोणतीही दखल घेतलेली नाही. जनतेतून तीव्र रोष निर्माण झाला आहे. आज मंगळवार सकाळी १० वाजल्यापासून लिंबाजी माळी, कामाण्णा बंडगर, निंगाप्पा कोरे, नागेश ऐवळे, प्रकाश माळी, तुकाराम कोरे आमरण उपोषणास बसणार आहेत.


