जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत तालुक्यातील येळवी येथे नामवंत कीर्तनकार प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन येळवी येथील ओंकारस्वरूपा कॉलेजच्या मैदानात उद्या २३ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता विठोबा जमदाडे व लोचनाबाई विठोबा जमदाडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली किर्तन सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवनेरी कन्ट्रक्शनचे सर्वेसर्वा दऱ्याप्पा जमदाडे यांनी दिली. या सोहळ्यास गायक म्हणून आळंदीचे शेटे महाराज, कैलास महाराज आणि उद्धव माऊली शिंदे उपस्थित राहणार आहेत. वादक म्हणून राजाराम महाराज देवडकर (आळंदी) आणि हभप नितीन महाराज हारकळ वादनाची साथ करणार आहेत. इंदुरीकर महाराजांना कीर्तनासाठी दिघंची येथील श्री विश्व माऊली अध्यात्मिक केंद्राचे सचिन महाराज कुंभार आणि त्यांचा ग्रुप साथ देणार आहे. तत्पूर्वी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांचे आई-वडील विठोबा जमदाडे व लोचनाबाई यांनी प्रतिकूल परिस्थितीतही पंढरपूरची एकादशीची वारी आयुष्यभर अखंड चालू ठेवली. घरची परिस्थिती कठीण असतानाही त्यांनी नातवंडांना शिक्षणासाठी पुढे जाण्यास प्रोत्साहित केले. आज या कुटुंबातील एक सदस्य अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहे, ही त्यांच्या संस्कारांचीच साक्ष आहे. आई-वडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणूनच हा कीर्तन सोहळा आयोजित केला असल्याचे जमदाडे कुटुंबियांनी सांगितले. या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जमदाडे कुटूंबियांनी केले

