जतवार्ता न्यूज नेटवर्क;
दरीबडची (ता. जत) येथे आज दुरुग मुर्गी समाजातील गरजू कुटुंबे व मुलांसाठी विविध स्वरूपाची मदत व साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. थंडी, अंधार आणि असुरक्षित निवाऱ्यांमध्ये जीवन जगणाऱ्या कुटुंबांसाठी हा उपक्रम माणुसकीची जिवंत अनुभूती देणारा ठरला.
या कार्यक्रमात शिवछाया सेवाभावी संस्था, दरीबडची यांच्या वतीने दुरुग मुर्गी समाजातील मुलांना स्वेटर व आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. उबदार कपडे मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद व आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला.
सामाजिक जाणिवेतून पुढे येत श्रीमंत तांबे यांनी या समाजासाठी शेडनेट, ताडपत्री तसेच तात्काळ लाईट सुविधा उपलब्ध करून दिल्या. पावसापासून व थंडीपासून संरक्षण, तसेच रात्रीच्या अंधारात प्रकाश मिळाल्याने कुटुंबांच्या दैनंदिन जीवनात तातडीचा दिलासा मिळाला.
या उपक्रमासाठी संजय वायफळकर यांनी कपडे खरेदीसाठी आर्थिक मदत केली. तसेच मोगली अँड ब्रदर्स, जत यांच्याकडून कानटोपी, स्वेटर व कपडे, तर शिवम क्लॉथ स्टोअर्स, जत यांच्याकडून कपडे व स्वेटर अशी मोलाची मदत मिळाली.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमंत तांबे दरेश्वर चौगुले, सूर्यवंशी सर, विशाल माने (एच.आर.), यंकू चव्हाण, रवींद्र वळसंघ, शरद कांबळे सर, सुरेश पुजारी यांच्यासह अनेक मित्रपरिवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
संस्थेचे सचिव अजित सनदी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “दुरुग मुर्गी समाजातील कुटुंबांना केवळ मदत नव्हे तर सन्मानजनक, सुरक्षित जीवनमान मिळावे, यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे.” कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय व व्यवस्थापन एच.आर. (Human Resources – मानव संसाधन) विशाल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. कार्यक्रम भावनिक, सकारात्मक आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणाऱ्या वातावरणात संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

