रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ने जत विधानसभा निवडणुक-२०२४ साठी ठोकला शड्डू.
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चे माजी सांगली जिल्हा अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव व आदर्श पुरस्कार विजेते माजी सरपंच माननीय संजयजी कांबळे यांनी जत विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव माननीय संजयजी कांबळे यांनी जत विधानसभा मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया साठी सोडण्यात यावा अशी जाहीर मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवलेसो व रि.पा.ई.चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय राजाभाऊ सरवदेसो यांच्याकडे केली आहे.
जत विधानसभा क्षेत्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद असून सर्व जाती-धर्माचे लोक रिपब्लिकन पक्षांमध्ये कार्यरत आहेत. रिपब्लिकन पक्षाने जत तालुक्याच्या विकासासाठी वेळोवेळी आंदोलने निदर्शने निवेदने करून सरकारला व प्रशासनास जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आयोजित आंदोलने व निदर्शने यामध्ये बहुतांश आंदोलने हे यशस्वी पद्धतीने मार्गस्थ झालेली आहेत. म्हैसाळ ताकारी योजनेचे च्या पाण्यासाठीचे आंदोलन असो अथवा जत शहराचा विकासाबाबतची आंदोलन असो प्रत्येक आंदोलनामध्ये रिपब्लिकन पक्षाने नाविन्यपूर्ण कार्य करून विषय व्यवस्थितरीत्या मार्गी लावून जनकल्याणाचे महत्त्वाचे व मोलाचे कार्य केले आहे. या संपूर्ण आंदोलनामध्ये रिपब्लिकन पक्षाचे निर्भीड धडाडीचे नेते माननीय संजयजी कांबळे साहेब यांच्या पुढाकाराने जत तालुक्यामध्ये चांगल्या रीतीने जलकल्ल्याचे कार्य चालू असून यापुढेही जोमाने कार्य करण्यासाठी माननीय संजय कांबळे यांना जत विधानसभेचे उमेदवारी महायुतीतून मिळावी असे जत विधानसभा क्षेत्रातील जनतेची मागणी आहे.
जत विधानसभा निवडणूक २०२४ साठी सक्षम व स्थानिक उमेदवार म्हणून संजयजी कांबळे यांच्या नावाची चर्चा संपूर्ण जत विधानसभा क्षेत्रामध्ये चालू असताना रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव मा. संजयजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चा जाहीर मेळावा व भव्य मोटार सायकल रॅली दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ०४-०० वाजता मंगळवार पेठ, गांधी चौक, जत. येथे आयोजित करण्यात आली आहे.
आयोजित मोटारसायकल रॅली व जाहीर सभेस रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे, रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा निरीक्षक सुनील सर्वगौड, महाराष्ट्र प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे, ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नाना वाघमारे, सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, युवक सांगली जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा मा. छायादीदी सर्वदे, यांचे सह रिपब्लिकन पक्षाचे सर्व आघाडीचे जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी जत विधानसभा मतदार संघातील व सांगली जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे व संजयजी कांबळे यांनी केले आहे.