yuva MAharashtra जत तालुक्यात भाजपचे वर्चस्व; ९ पैकी ८ जिल्हा परिषद गटांवर सत्ता, जाडरबोबलादमध्ये रविपाटील यांची ४० वर्षांची परंपरा कायम

जत तालुक्यात भाजपचे वर्चस्व; ९ पैकी ८ जिल्हा परिषद गटांवर सत्ता, जाडरबोबलादमध्ये रविपाटील यांची ४० वर्षांची परंपरा कायम

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अत्यंत चुरशीने पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निकालात तालुक्याच्या राजकारणात भाजपचे स्पष्ट वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एकूण ९ जिल्हा परिषद गटांपैकी ८ गटांवर भाजपने विजय मिळवत सत्ता अबाधित राखली असून जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना विजय मिळवता आला आहे.
     पंचायत समितीच्या १८ गणांपैकी १२ गणांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसला ४ गणांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने २ गणांमध्ये यश संपादन केले. या निकालामुळे जत तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचा दबदबा अधिकच मजबूत झाला आहे.
जाडरबोबलादमध्ये रविपाटील यांची ४० वर्षांची विजयी परंपरा कायम;
     जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटात यावेळी वेगळे राजकीय चित्र पाहायला मिळाले. रवी पाटील गट आणि अंकलगी गट एकत्र आल्याने भाजपला या गटात पराभव स्वीकारावा लागला. रवी पाटील यांचे खंदे समर्थक कामान्ना बंडगर यांची नाराजी यशस्वीरीत्या दूर करत राजकीय समतोल साधण्यात आला. या एकजुटीमुळे रविपाटील यांच्या गटाने तब्बल ४० वर्षांची विजयी परंपरा कायम ठेवत विजय खेचून आणला.

जिल्हा परिषद गट व गणनिहाय निकाल; उमेदवारांची नावे पक्ष व मिळालेली मते;
१) जाडरबोबलाद जि. प. गट
सावित्री रविपाटील – राष्ट्रवादी (घड्याळ)११५४८
जाडरबोबलाद गण – कल्पना अंकलगी (घड्याळ)६३५७
माडग्याळ गण – शालनताई कोरे (घड्याळ)४८३३
२) उमदी जि. प. गट
यलगोंडा तोरणे – भाजप ९९०६
उमदी गण – संगीता सावंत (काँग्रेस)४९३९
करजगी गण – उत्तमराव कट्टीमनी (भाजप)४७६०
३) संख जि. प. गट
कविता पाटील – भाजप ८२३७
संख गण – सदाशिव दर्गाकर (भाजप)३५२९
गिरगाव गण – राविकुमार बगली (भाजप)४६६८
४) दरीबडची जि. प. गट
सरदार पाटील – भाजप ७६६६
दरीबडची गण – लक्ष्मण चव्हाण (काँग्रेस)३८६८
तिकोंडी गण – नकुसा शेंडगे (भाजप)४७५३
५) मुचंडी जि. प. गट
रमेश देवर्षी – भाजप ११०६०
मुचंडी गण – सुनीता बेडगे (भाजप)५४६९
खोजनवाडी गण – विना बिरादार (भाजप)५१३५
६) बनाळी जि. प. गट
सुनील पवार – भाजप ९५८२
बनाळी गण – प्रमोद सावंत (काँग्रेस)४४२४
येळवी गण – विजय रुपनूर (भाजप)४४५८
७) शेगाव जि. प. गट
डॉ. शिवाजी खिलारे – भाजप १२०७३
शेगाव गण – सचिन बोराडे (भाजप)४५८२
कोसारी गण – अर्चना पाटील (भाजप)६८०८
८) डफळापूर जि. प. गट
स्वप्नाली मासाळ – भाजप १२१५९
डफळापूर गण – महेश गावडे (भाजप)५९१५
बाज गण – मनीषा दुधाळ (भाजप)६२६७
९) बिळूर जि. प. गट
शिल्पा जिवाणावार – भाजप ९९८४
बिळूर गण – बसवराज घेज्जी (काँग्रेस)४८०२
उमराणी गण – मीनाक्षी अभंगे (भाजप)३७४५
भाजपचा ‘स्ट्राँग होल्ड’ कायम;
     या निकालातून जत तालुक्यात भाजपचा मजबूत जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. बहुसंख्य जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांवर मिळालेल्या विजयामुळे आगामी काळातील तालुक्याच्या राजकारणात भाजप निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तर जाडरबोबलादमध्ये राष्ट्रवादीने आपली परंपरा जपत भाजपला आव्हान दिले असून तेथील राजकीय समीकरणे आगामी काळात अधिक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.