yuva MAharashtra शेगाव मंडल अधिकाऱ्यावर कार्यालयात हल्ला | शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की; शासकीय कागदपत्रे फाडल्याचा आरोप

शेगाव मंडल अधिकाऱ्यावर कार्यालयात हल्ला | शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की; शासकीय कागदपत्रे फाडल्याचा आरोप

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी :
     शेगाव (ता. जत) येथील मंडल अधिकारी कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना मंडल अधिकाऱ्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी (दि. ६) दुपारी घडली. याप्रकरणी नामदेव कृष्णा हिप्परकर (रा. सिंगणहळ्ळी) याच्याविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडल अधिकारी दिलीप चौरे (वय ४७) हे शेगाव मंडल कार्यालयात शासकीय कामकाज करीत असताना दुपारी सव्वाएकच्या सुमारास आरोपी नामदेव हिप्परकर कार्यालयात आला. त्याने चौरे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
     यावेळी आरोपीने मंडल अधिकाऱ्यांच्या शर्टला धरून धक्काबुक्की केली तसेच कार्यालयातील शासकीय कागदपत्रे फाडली. या प्रकारामुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
     या घटनेप्रकरणी मंडल अधिकारी दिलीप चौरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जत पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार नामदेव गोडसे करीत आहेत.