yuva MAharashtra प्रजासत्ताक दिनी येळदरी गावकऱ्यांचा ऐतिहासिक विक्रम ! जि. प. शाळेस तब्बल 3,48,000 ची देणगी ; शिक्षणासाठी गाव एकवटले

प्रजासत्ताक दिनी येळदरी गावकऱ्यांचा ऐतिहासिक विक्रम ! जि. प. शाळेस तब्बल 3,48,000 ची देणगी ; शिक्षणासाठी गाव एकवटले

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     दि. 26 जानेवारी 2026 रोजी पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा, येळदरी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व अभिमानास्पद वातावरणात साजरा करण्यात आला. याच दिवशी येळदरी गावकऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी 3,48,000 रुपयांची सढळ देणगी देत एक नवा सामाजिक विश्वविक्रम रचला, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.
     कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक दीपक सावळा सुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. “प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो” अशा घोषणांसह विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून गावात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण केले.
     यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर, येळदरी ग्रामपंचायत कार्यालयशहीद जवान स्मारक येथेही ध्वजारोहण संपन्न झाले. संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन, मतदार शपथ व नवसाक्षरता शपथ घेण्यात आली.
     प्रभात फेरीनंतर शाळा परिसरात पालकांचे मनोगत व विद्यार्थ्यांची प्रभावी भाषणे झाली. यावेळी सचिन देवकते यांनी व्यसनमुक्ती, विद्यार्थी गुणवत्ता वाढ तसेच शाळेत विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या विविध गरजा मांडत मुख्याध्यापकांनी गावकऱ्यांना सहकार्याचे आवाहन केले.
     या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद देत येळदरी गावातील दानशूर व्यक्ती, संस्था व संघटनांनी शाळेच्या विकासासाठी मदतीचा अक्षरशः पाऊस पाडला.
देणगीदारांची ठळक यादी :
पीएसआय महादेव वाघमारे – ₹51,000
भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी – ₹2,000
अंगणवाडी विद्यार्थ्यांसाठी – ₹500
महादेव गौडाप्पा उत्तरे – ₹40,000
तुकाराम जकप्पा माने (माजी उपसरपंच) – ₹25,000
माजी सैनिक संघटना, येळदरी – ₹25,000
अनिल चन्नप्पा उत्तरे – ₹25,000
राजमाता अहिल्यादेवी होळकर ग्रुप, येळदरी – ₹25,000
कार्यरत सैनिक अशोक यशवंत सरगर – ₹25,000
मारुती जयवंत माने (जेसीबी मालक, सामाजिक कार्यकर्ते) – ₹25,000
लक्ष्मण जकप्पा माने – ₹25,000
पीटीएस फार्मा मेडिकलचे मालक व माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष स्वप्निल पुंडलिक सरगर – ₹25,000 व मेडिकल किट
सूरज मारुती सरगर – ₹15,000
शालेय व्यवस्थापन समिती सदस्य गंगाधर देवकते – ₹11,000
ट्रॅक्टर संघटना, येळदरी – ₹11,000
     तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिद्धप्पा चौगुले यांनी विद्यार्थ्यांना २ कॅरेट केळी व भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹700 बक्षीस, उपाध्यक्ष जयश्रीताई सेनाजी वाघमारे यांनी १५ किलो लाडू, मार्केट कमिटी संचालक रमेश पाटील (रामपूर)मल्लाळ गावचे सरपंच मारुती पवार यांच्याकडून शैक्षणिक साहित्य, तसेच विद्यार्थ्यांसाठी समोसे खाऊ देण्यात आला.
     इतक्या मोठ्या प्रमाणावर मिळालेल्या सहकार्याबद्दल मुख्याध्यापक दीपक सुर्वे यांनी सर्व दानशूर व्यक्ती व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले. “गावकऱ्यांची अशीच साथ लाभत राहिली तर शाळेचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
     अखेर उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रजासत्ताक दिनी शिक्षणासाठी एकजूट दाखवणारे येळदरी गाव आज संपूर्ण तालुक्यात प्रेरणादायी ठरत आहे.