yuva MAharashtra आदिवासी पारधी समाजासाठीच्या कार्याबद्दल बसवराज चव्हाण यांचा सन्मान | खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव

आदिवासी पारधी समाजासाठीच्या कार्याबद्दल बसवराज चव्हाण यांचा सन्मान | खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी : 
     आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत बहुजन सत्यशोधक संघटनेच्या वतीने आदिवासी पारधी समाजाचे जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
     आदिवासी पारधी समाजातील बांधवांना सामाजिक प्रवाहात आणणे, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि समाजाच्या विकासासाठी योगदान देणे, या कार्याची दखल घेऊन बसवराज चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. या गौरवामुळे समाजाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
     या कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (महाराष्ट्र) चे सचिव नंदकुमार केंगार, जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक नामदेव काळे, सांगली महानगरपालिकेचे नगरसेवक सचिन सावंत यांच्यासह बहुजन समाजातील विविध नेते, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच अकलूज, माळीनगर व सवतगाव परिसरातील आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.