yuva MAharashtra सभापती-उपसभापतींचा ग्रामपंचायत अधिकारी युनियनकडून सत्कार

सभापती-उपसभापतींचा ग्रामपंचायत अधिकारी युनियनकडून सत्कार

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी :
     जत पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ. अर्चना नाथा पाटील तसेच उपसभापतीपदी श्री. रविकुमार बगली यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (डी.एन.ई. १३६) तालुका शाखा जत यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
     यावेळी बोलताना सभापती व उपसभापती यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची समन्वयाने सांगड घालून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रशासनाच्या कामकाजात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास लोकप्रतिनिधी म्हणून आपण कायम पाठिंबा देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
       या सत्कार समारंभास युनियनचे तालुकाध्यक्ष सुरेश खोत, उपाध्यक्ष आनंदा राठोड, सचिव शंकर कोरे, जिल्हा कार्याध्यक्ष पैगंबर नदाफ, मानद अध्यक्ष हुसेन पटेल, कार्याध्यक्ष दादासाहेब चव्हाण, कोषाध्यक्ष दत्तात्रय साळे यांच्यासह शिवाजी जाधव, विष्णु बोरकर, शिवाजी पवार, प्रसाद कुंभार, विनायक माळी, संगाप्पा बसर्गी, अंबरीश तेली, आसमा नदाफ, मुंजुषा गारुळे, सुप्रिया कांबळे, अविनाश पाटील, मल्लीकार्जुन कोळी आदी पदाधिकारी व तालुक्यातील मोठ्या संख्येने ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
Tags: