yuva MAharashtra ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात के. एम. हायस्कूल व ज्यु. कॉलेज ची झेप

५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात के. एम. हायस्कूल व ज्यु. कॉलेज ची झेप

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ व पंचायत समिती शिक्षण विभाग जत, व दि फ्रेंड्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिशस्कूल व ज्यु.कॉलेज माडग्याळ या ठिकाणी ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे दि. ९ व १० डिसेंबर रोजी  आयोजन करण्यात आले होते.
     या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.यामध्ये विध्यार्थ्यांनी विज्ञानाच्या विविध संकल्पनेवर आधारित प्रतिकृती, प्रयोग व प्रकल्प  सादर केले. दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्व, पर्यावरण, संरक्षण, ऊर्जाबचत, आरोग्यविषयक उपाय योजना आदी विषयावरील प्रकल्प विशेष आकर्षण ठरले. निबंध स्पर्धा, वक्तृत्व व प्रश्न मंजुषास्पर्धाद्वारे  विध्यार्थांनी  आपले वैज्ञानिक ज्ञान व विचारशक्ती व आत्मविश्वास प्रभाविपणे व्यक्त केला.
     या प्रदर्शनामध्ये के. एम. हायस्कूल व ज्यु. कॉलेज च्या विध्यार्थीनी कु. सानिका नागनाथ माने हिने कचरा व्यवस्थापन व प्लास्टिकला पर्याय या विषयांतर्गत  प्लास्टिक पुन- चक्रीकरण या साहित्याची निर्मिती करून इ. ९ वी ते १२ या मोठया गटात प्रथम क्र. मिळविला. तसेच कु. प्रतिका मारुती माळी हिने वक्तृत्व स्पर्धेत इ. ६ वी ते ८ वी (कन्नड माध्यम विभाग) द्वितीय क्र. मिळविला, तर कु. सानिका माने हिने बनविलेल्या साहित्याची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
     या विध्यार्थीनिस के. एम. हायस्कूल व ज्यु. कॉलेज चे प्राचार्य एस. एम. सोलापुरे सर व प्राध्यपिका सौ. आर.टी. माळी यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रदर्शनामध्ये न्यू. इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज चे प्राचार्य एस. आय. हिरगोंडसर व जत तालुका गणित व विज्ञान मंडळाचे सचिव कुंभार सर यांच्या योग्य नियोजणामुळे हे विज्ञान प्रदर्शन चांगल्या प्रकारे पार पडला.
     आमदार गोपीचंद पडळकर यांनी या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची दखल घेऊन नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनातून वेळ काढून व्हीडीओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी विध्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
     त्याचप्रमाणे जत पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी राम फरकांडे, शिक्षणविस्तार अधिकारी अन्सर शेख आदींनी यशस्वी विध्यार्थीनींचे प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.