yuva MAharashtra व्यक्तिमत्व विकासाला पोषक वातावरण राष्ट्रीय सेवा योजनेतून निर्माण होते; प्रा.चंद्रसेन मानेपाटील

व्यक्तिमत्व विकासाला पोषक वातावरण राष्ट्रीय सेवा योजनेतून निर्माण होते; प्रा.चंद्रसेन मानेपाटील

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
      व्यक्तिमत्व विकासाला पोषक वातावरण राष्ट्रीय सेवा योजनेतून निर्माण होते महाविद्यालयीन जीवन हे व्यक्तिमत्व विकासाची पहिली पायरी आहे. महाविद्यालयात संपन्न होणाऱ्या विविध कार्यक्रमात सहभाग घेतल्यास तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. महाविद्यालयीन जीवनात आनंद घेण्यापेक्षा दुसऱ्यांना आनंद देण्यात आनंद आहे आणि दुसऱ्यांना आनंद देण्याची भावना राष्ट्रीय सेवा योजना शिकवते, असे प्रतिपादन माजी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.चंद्रसेन मानेपाटील यांनी केले. 
     ते मौजे रामपूर (जत) येथे राजे रामराव महाविद्यालय, जत च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या "विशेष श्रमसंस्कार शिबिराप्रसंगी "व्यक्तिमत्त्व विकास व माझा युरोप दौरा" या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.भिमाशंकर डहाळके  हे होते. यावेळी पोलीस पाटील प्रविण निकम, कार्यक्रम अधिकारी डॉ.मेहजबिन मुजावर हे उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पुंडलिक चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत करुन आपल्या प्रास्ताविकात विशेष श्रमसंस्कार शिबीराचा उद्देश सांगितला.
        पुढे बोलताना चंद्रसेन मानेपाटील पुढे म्हणाले की, व्यक्तिमत्व विकासाबरोबरच विद्यार्थी जीवनात श्रमाचे संस्कार रुजवण्याची गरज आहे, असे सांगून त्यांनी "माझा युरोप दौरा" या कार्यक्रमामधून युरोप दौऱ्यातील अनुभव, गंमती-जमती सांगून पर्यटन व्यवसायामध्ये व्यक्तिमत्व विकासाला अन्य साधारण महत्त्व आहे असे सांगितले. यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.भीमाशंकर डहाळके यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाल्यास पर्यटनासारख्या क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. श्रवण,वाचन,भाषण व संभाषण या कौशल्याचा विकास केल्यास पर्यटनासारख्या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकता असे सांगितले. शेवटी आभार डॉ.सोमनाथ गायकवाड यांनी मानले.