yuva MAharashtra आवाे खुशिया बाटे मंचाच्या वतीने माजी सैनिकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन उत्साहात

आवाे खुशिया बाटे मंचाच्या वतीने माजी सैनिकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन उत्साहात

जत वार्ता न्यूज
By -

देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावले; विविध समाजातील नागरिकांची मोठी उपस्थिती

जत | प्रतिनिधी : 
     छत्रपाल रोड येथील पिंजारी गुरुजी फार्म हाऊस येथे आवाे खुशिया बाटे मंचाच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम देशभक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला माजी सैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
     माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन बबनराव कोळी, कॅप्टन बाबासाहेब पांढरे, उपाध्यक्ष मेजर महेश कुमार जगताप, कॅप्टन उमाजी महानोर, कॅप्टन विजय कुरणे, मेजर दत्तात्रय शिंदे, मेजर बाळासाहेब भोसले, मेजर आनंदा हक्के, सुभेदार मेजर सतीश शिंदे, मेजर प्रवीण कदम, सुभेदार आकाराम दिसले, सुभेदार मेजर संतोष भोसले, मेजर अण्णा कांबळे, सुभेदार शिंदे, मेजर बामणे यांच्यासह अनेक माजी सैनिक उपस्थित होते.
     माजी सैनिकांनी सैनिकी शिस्तीचे दर्शन घडवत गणवेशात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कॅप्टन बबनराव कोळी, कॅप्टन बाबासाहेब पांढरे, डॉ. मकसूद तांबोळी, यासीन पिंजारी गुरुजी आणि परममित्र राजू इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत सादर करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
     कार्यक्रमानंतर उपस्थित माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यासीन पिंजारी गुरुजी, सिकंदर पिंजारी गुरुजी, हाजी मशीन पटाईत, डॉ. मकसूद तांबोळी आणि परममित्र राजू इनामदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
     यावेळी माजी सरपंच नशीब मुल्ला, नगरसेवक फिरोजभाई मुल्ला, फिरोज मुल्ला सर, मकबुल टपाले, दस्तगीर टपाले, नासिर पटाईत, सिकंदर पटाईत यांच्यासह विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशसेवेतील बलिदानाला मानवंदना;
     यावेळी कॅप्टन बबनराव कोळी, कॅप्टन बाबासाहेब पांढरे, डॉ. मकसूद तांबोळी आणि मंचाचे अध्यक्ष यासीन पिंजारी गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सैनिकांनी दिलेले बलिदान, देशसेवेत मुस्लिम समाजाचे योगदान तसेच सर्व समाजातील नागरिकांमध्ये असलेल्या बंधुभावाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
     देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाचे वातावरण भारावून गेले. मुस्लिम समाजातील बांधवांसह विविध समाजातील नागरिकांनी एकत्र येत स्वातंत्र्यदिन साजरा केला. माजी सैनिकांप्रती कृतज्ञता आणि देशप्रेमाचा संदेश देणारा हा कार्यक्रम सामाजिक एकोपा व बंधुभावाचे दर्शन घडविणारा ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शफिक इनामदार यांनी केले, तर राजू इनामदार यांनी आभार मानले.