yuva MAharashtra अखेर शिक्षकेतर पदभरतीला हिरवा कंदील! कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक पदे भरण्याचा मार्ग मोकळा; शिवाजीराव खांडेकर यांच्या पाठपुराव्याला यश

अखेर शिक्षकेतर पदभरतीला हिरवा कंदील! कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक पदे भरण्याचा मार्ग मोकळा; शिवाजीराव खांडेकर यांच्या पाठपुराव्याला यश

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी : 
     राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी असून, अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर पदभरतीला अखेर शासनाने मंजुरी दिली आहे. दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित करून कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील रिक्त पदे नियमानुसार भरण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
     महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे सरकार्यवाह मा. शिवाजीराव खांडेकर यांनी या प्रश्नासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. दि. ५ ऑगस्ट रोजी प्रधान सचिवांसोबत झालेल्या बैठकीतही त्यांनी शिक्षकेतर पदभरतीचा प्रश्न ठामपणे मांडला होता. शिक्षक भरतीच्या धर्तीवर शिक्षकेतर पदांची भरती सुरू करण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते.
     या पाठपुराव्यानंतर अवघ्या काही दिवसांत शासन निर्णय निर्गमित झाल्याने शिक्षकेतर कर्मचारी तसेच नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा निर्णय म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा, संघर्षाचा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा विजय असल्याची भावना व्यक्त होत आहे.

शिक्षकेतर पदभरती : ठळक मुद्दे
११ ऑगस्ट २०२६ — शासन निर्णय
🔹 कनिष्ठ लिपिक पदे भरण्यास मंजुरी
🔹 पूर्णवेळ ग्रंथपाल पदांना मान्यता
🔹 प्रयोगशाळा सहाय्यक पदे भरण्याचा मार्ग मोकळा
🔹 अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम
🔹 शिक्षकेतर संघटनांच्या पाठपुराव्याला यश
🔹 पात्र उमेदवारांना रोजगाराची नवी संधी