yuva MAharashtra प्रा.सचिन चव्हाण यांची शिक्षक लोकशाही आघाडीच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा.सचिन चव्हाण यांची शिक्षक लोकशाही आघाडीच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी;
      श्री.रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,जत येथे कार्यरत असलेले प्रा.सचिन चव्हाण यांची शिक्षक लोकशाही आघाडी (की.डी.एफ.)या संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य टी.डी.एफ. संघटनेचे राज्य अध्यक्ष मा. श्री. के. थोरात यांच्या हस्ते सत्कार करुन त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. 
     प्रा.सचिन चव्हाण हे रामराव विद्यामंदिर हायस्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज जत येथे कार्यरत असून आजपर्यंत त्यांनी संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध प्रश्नांविषयी सातत्याने आवाज उठविला आहे. शिक्षकांच्या अनेक प्रश्नांबाबत त्यांनी संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शिक्षक लोकशाही आघाडी या संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सांगली जिल्ह्य व जत तालुक्यातून शिक्षक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.