yuva MAharashtra खुल्या जागेचा वृक्षारोपणातून कायापालट; विवेक बसव प्रतिष्ठानचा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम

खुल्या जागेचा वृक्षारोपणातून कायापालट; विवेक बसव प्रतिष्ठानचा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम

जत वार्ता न्यूज
By -


जत | प्रतिनिधी :

     जत येथे डफळे कॉलनीतील खुल्या जागेत विवेक बसव प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
     कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश जमदाडे उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शालिवन पट्टणशेट्टी यांनी त्यांचे स्वागत केले. प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सरिता पट्टणशेट्टी यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व तसेच वृक्षांचे संगोपन व पर्यावरण संवर्धनाची गरज याबाबत मार्गदर्शन केले.
     वृक्षारोपणानंतर लागवड केलेल्या रोपांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रकाश जमदाडे यांनी कुंपणाची व्यवस्था करून दिली. विवेक बसव प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला जात असून, यंदा डफळे कॉलनीतील खुल्या जागेचा पर्यावरणपूरक विकास करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
     यावेळी नगरसेवक विकास माने, योगेश बामणे, रोहिणी शंकरदास, आशीर्वाद क्लासचे शिंदे सर, व्हणमाने सर, अशोक तेली, कृष्णा कोळी, डॉ. विठ्ठल बजंत्री, दगडू माळी, पवार सर, उमेश शिंदे, पिंटू मोरे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिल्पा पवार यांनी केले, तर सुभाष कोरे यांनी आभार मानले.