जत | प्रतिनिधी :
जत येथील कराटेपटूंनी २७ सप्टेंबर रोजी नदाफ हॉल येथे झालेल्या बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. युनिव्हर्सल शोतोकॉन कराटे-डो असोसिएशन यांच्या वतीने आयोजित या परीक्षेत जत येथील विद्यार्थ्यांनी विविध बेल्ट श्रेणींमध्ये यश मिळविले.
यशस्वी कराटेपटूंमध्ये येलो बेल्ट श्रेणीत ऐश्वर्या सावंत, हबीब शेख, फातिमा नगारजी, शफिया नगारजी, विहान कांबळे, वेदांश कांबळे, रिहान भंडारे, राहील भंडारे, चंद्रकांत मन्सूरे, अथर्व वाघमारे, शिवानी करे, समृद्धी सोनुरे, रोहन हिंदुस्तानी, बाबूरियान नगराजी, सक्षम धनगर, शुभम धनगर, रोशन कटरे, रुद्रांश मोगले, आर्या मोगले, आदित्य बरमदे व ओमप्रकाश पुजारी यांनी यश मिळविले.
ऑरेंज बेल्टमध्ये साहिल मुजावर व अनवी मोगले, ग्रीन बेल्टमध्ये श्रावणी सावंत व आर्यन डोळळी, तर ब्लू बेल्टमध्ये संस्कार कोरे व प्रणव केंगार यांनी यश संपादन केले. पर्पल बेल्टमध्ये अवनिश कोळी, ब्राऊन बेल्टमध्ये श्रुती वाघमारे व घनश्याम बल्लारी, येलो-ब्राऊन बेल्टमध्ये देवदत्त खराडे, तर ब्लॅक बेल्टमध्ये सम्राट साळुंखे यांनी यश मिळविले.
या परीक्षेसाठी राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक विजय तिकोटी यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. सहकारी प्रशिक्षक अमृता भंडारे व रोहन तिकोटी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जत नगरसेवक गौतम ऐवळे उपस्थित होते. कराटेपटूंनी मिळविलेल्या यशाबद्दल पालकवर्गातून त्यांचे कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे जतच्या कराटे क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे.

