yuva MAharashtra शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख यांना ‘बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ पुरस्कार

शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख यांना ‘बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ पुरस्कार

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी ;
     जत पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याची दखल घेत जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी त्यांना ऑगस्ट महिन्याचा ‘बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ पुरस्कार देऊन गौरविले.
     अन्सार शेख हे जत तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहेत. चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा, डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता शोध परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तसेच NMMS यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी ते विद्यार्थी, शिक्षक व पालकांना सातत्याने मार्गदर्शन करतात.
     तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध मार्गदर्शन शिबिरे, शैक्षणिक उपक्रम व गुणवत्तावर्धक कार्यक्रमांचे नियोजन करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला आहे. शिक्षकांना सातत्याने मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्याची त्यांची कार्यपद्धती उल्लेखनीय ठरली आहे.
     शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, उत्तम नियोजन आणि प्रशासकीय कार्याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी शेख यांना ऑगस्ट महिन्याचा ‘बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ पुरस्कार प्रदान केला. या पुरस्काराबद्दल शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालकांकडून अन्सार शेख यांचे अभिनंदन होत आहे.