जतवार्ता न्यूज नेटवर्क;
शेगाव जिल्हा परिषद गटासाठी परशुराम सांगोलकर, शेगाव पंचायत समिती गणासाठी साहेबराव शिंदे तर कोसरी पंचायत समिती गणातून दिपाली चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या वतीने अधिकृतपणे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मोठ्या उत्साहात आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही नामनिर्देशन प्रक्रिया पार पडली.
यावेळी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विजयाचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना लक्ष्मण बोराडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शेगाव जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. जनतेचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांची ताकद आमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.”
तर कुंडलिक दुधाळ पाटील यांनी देखील विश्वास व्यक्त करत म्हटले की, “संपूर्ण तालुक्यात महाविकास आघाडीची संघटना भक्कम आहे. विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढवत असून जनतेचा कौल आमच्या बाजूनेच येईल.”
उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने शेगाव गटातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी व विरोधी गटात चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

