yuva MAharashtra आवाे खुशिया बाटे युवा मंचतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त गौरवशाली ध्वजारोहण सोहळा

आवाे खुशिया बाटे युवा मंचतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त गौरवशाली ध्वजारोहण सोहळा

जत वार्ता न्यूज
By -
 

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     आवाे खुशिया बाटे युवा मंच, छत्रीबाग रोड, जत यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य व उत्साहपूर्ण ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मकसूद तांबोळी उपस्थित होते.
    या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक संघटनेचे सर्व माजी सैनिक तसेच विशेष उपस्थिती म्हणून कॅप्टन बाबासाहेब पांढरे लाभले. ध्वजारोहणाचा मान कॅप्टन बाबासाहेब पांढरे यांच्या हस्ते पार पडला. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
     कार्यक्रमास व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष पिंजारी गुरुजी, राजू इनामदार, बंडू शेख, रियाज शेख, नासीर पटाईत, मकबूल नदाफ, मोहन माने पाटील, शौकत पटाईत, मोसिन पटाईत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचे स्वागत युवा मंचचे शफिक इनामदार व सहकाऱ्यांनी उत्साहात केले.
     अध्यक्षीय भाषणात डॉ. मकसूद तांबोळी म्हणाले, “देशाच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या माजी सैनिकांप्रती आम्ही सदैव ऋणी आहोत. गणतंत्र दिनासारख्या पवित्र दिवशी त्यांचा सन्मान होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
     यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी सैनिक कॅप्टन बाबासाहेब पांढरे म्हणाले, “देशाच्या सीमेवर आम्ही दिवस-रात्र सज्ज होतो. आज तुम्ही आम्हाला देशाचा झेंडा फडकवण्याचा मान दिलात, हे आमच्यासाठी मोठे भाग्य आहे. हा सन्मान आम्ही आयुष्यभर जपू.”
     संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात, उत्साह व अभिमानाने पार पडला. आवाे खुशिया बाटे युवा मंचच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून सामाजिक सलोखा व राष्ट्रप्रेमाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी मंचचे अध्यक्ष यासीन पिंजारी गुरुजी यांनी उपस्थितांचे व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.