yuva MAharashtra मुचंडी जिल्हा परिषद गटातून रमेश देवर्षी यांचा उमेदवारी अर्ज दाखल; मुचंडी पंचायत समिती गणातून सुनिता बेडगे, खोजनवाडी गणातून विना बिराजदार यांचीही अधिकृत उमेदवारी

मुचंडी जिल्हा परिषद गटातून रमेश देवर्षी यांचा उमेदवारी अर्ज दाखल; मुचंडी पंचायत समिती गणातून सुनिता बेडगे, खोजनवाडी गणातून विना बिराजदार यांचीही अधिकृत उमेदवारी

जत वार्ता न्यूज
By -
 
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     मुचंडी जिल्हा परिषद गटातून रमेश देवर्षी, मुचंडी पंचायत समिती गणातून सुनिता अप्पासाहेब बेडगे तसेच खोजनवाडी पंचायत समिती गणातून विना रमेश बिराजदार यांनी भाजप पक्षातून एबी फॉर्मसह मोठ्या शक्ती शक्ती प्रदर्शनात आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केले. यावेळी समर्थक व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
     रमेश देवर्षी हे आमदार गोपीचंद पडळकर यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू कार्यकर्ते म्हणून सर्वपरिचित आहेत. सामाजिक, राजकीय व विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. देवर्षी यांच्या भगिनी सध्या मुचंडी ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून कार्यरत असून ग्रामविकासासाठी सक्रिय भूमिका बजावत आहेत.
     यावेळी बोलताना रमेश देवर्षी यांनी सांगितले की, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून मुचंडी व परिसरातील गावांसाठी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण व इतर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी हा निधी उपयुक्त ठरला आहे.
     मुचंडी गटातील जनतेने मला जिल्हा परिषदेवर निवडून दिल्यास, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून प्रत्येक गावासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणून सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास देवर्षी यांनी व्यक्त केला. तसेच पंचायत समिती गणातील उमेदवार सुनिता बेडगे व विना बिराजदार यांनीही जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख कारभार करण्याचे आश्वासन दिले.
     उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने मुचंडी व खोजनवाडी परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.