yuva MAharashtra चर्चा फक्त शिवसेना शिंदे गटाचीच! बनाळी जि.प. गटातून प्राची हिंगमिरे, पंचायत समिती गणातून अण्णासाहेब कोडग व अशोक गोरड यांचे उमेदवारी अर्ज दाखल

चर्चा फक्त शिवसेना शिंदे गटाचीच! बनाळी जि.प. गटातून प्राची हिंगमिरे, पंचायत समिती गणातून अण्णासाहेब कोडग व अशोक गोरड यांचे उमेदवारी अर्ज दाखल

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     बनाळी जिल्हा परिषद गटातून प्राची महादेव हिंगमिरे, बनाळी पंचायत समिती गणातून अण्णासाहेब कोडग तसेच येळवी पंचायत समिती गणातून अशोक गोरड यांनी शिवसेना शिंदे गटाकडून आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. जत तालुक्यातील उमदी येथे उभारण्यात येणारी नूतन एमआयडीसी शिवसेना शिंदे गटाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून साकार होत असून, यामुळे तालुक्यात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर परिवहन विभागाकडून जत येथे आरटीओ कार्यालयालाही मंजुरी मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
     तसेच महाराष्ट्राची जलवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हैशाळ विस्तारित पाणीपुरवठा प्रकल्पासाठी तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने जत तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीसाठीचा जिव्हाळ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. या प्रकल्पामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी व नागरिकांना मोठा आधार मिळाला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
     उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून जत तालुक्यातील कानाकोपऱ्यात विकास पोहोचवण्याचा निर्धार असल्याचे मत आंवढी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अण्णासाहेब कोडग व शिवसेना जत विधानसभा प्रमुख महादेव हिंगमिरे यांनी व्यक्त केले. बनाळी जिल्हा परिषद गटातील मतदारांनी शिवसेना शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून जिल्हा परिषदेवर काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
     उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बनाळी, येळवी व परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सध्या “चर्चा फक्त शिवसेना शिंदे गटाचीच” अशी भावना सर्वत्र दिसून येत आहे.