yuva MAharashtra स्वामी विवेकानंद ऑलिम्पियाड स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

स्वामी विवेकानंद ऑलिम्पियाड स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क
;
     जत येथील ज्योतिर्लिंग ग्रामीण विकास व संशोधन संस्था संचलित स्वामी विवेकानंद ऑलिम्पियाड स्कूल जत येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजे रामराव महाविद्यालय जत येथील सेवानिवृत्त प्राध्यापक गुलाबराव पाटील उपस्थित होते. याबरोबरच संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजीराव बिसले,  खजिनदार प्रा. तुकाराम सन्नके, संचालिका सौ. आसावरी जमगे हेही उपस्थित होते.
          कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली, त्यानंतर राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शिवाजीराव बिसले यांनी प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व, राष्ट्रनिर्मितीत दिलेले योगदान, पालकांची भूमिका तसेच भावी पिढीमध्ये देशाभिमान व जबाबदारीची भावना निर्माण करण्याचे महत्त्व यावर सविस्तर विचार मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे मूल्य आत्मसात करून जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहनही केले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण अनुभवास आले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिस्त, एकात्मता व सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.
       या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक शाळेच्या समन्वयक प्रतीक्षा चौगुले यांनी केले. सूत्रसंचालन सायली सोनवणे यांनी तर आभार सुप्रिया गायकवाड यांनी मांडले.