yuva MAharashtra जत पंचायत समिती सभापतीपदी विणा बिरादार यांना संधी द्या | खोजनवाडी गणातील कार्यकर्त्यांची जोरदार मागणी; पद सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी राखीव

जत पंचायत समिती सभापतीपदी विणा बिरादार यांना संधी द्या | खोजनवाडी गणातील कार्यकर्त्यांची जोरदार मागणी; पद सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी राखीव

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath :
     खोजनवाडी पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर भरघोस मतांनी निवडून आलेल्या विणा रमेश बिरादार यांना जत पंचायत समितीच्या सभापतीपदी संधी द्यावी, अशी मागणी गणातील कार्यकर्त्यांमधून जोर धरू लागली आहे. यंदाचे जत पंचायत समिती सभापती पद ‘सर्वसाधारण महिला’ या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने विना बिरादार यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
     विणा बिरादार या कायम पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. स्थानिक पातळीवर त्यांनी विविध विकासकामांत सक्रिय सहभाग घेतला असून पाणीपुरवठा, रस्ते, शैक्षणिक सुविधा आदी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे त्यांना प्रशासनाचा अनुभव आणि जनसंपर्काचा भक्कम पाया असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.
     खोजनवाडी गणातील देवनाळ, मेंढेगिरी, उंटवाडी, अमृतवाडी, पाछापूर, येळदरी, रामपूर, मल्लाळ आणि वाषाण या गावांना आजपर्यंत एकदाही सभापतीपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे या भागातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना होती. यावेळी आरक्षणाची संधी साधून खोजनवाडी गणाला प्रतिनिधित्व मिळावे आणि विणा बिरादार यांच्यामार्फत तालुक्याच्या विकासाला गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
     कार्यकर्त्यांच्या मते, पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि विकासाचा अनुभव या निकषांवर विणा बिरादार योग्य उमेदवार ठरतात. जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असून त्यासाठी पक्षश्रेष्ठींनी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.