yuva MAharashtra राजे रामराव महाविद्यालय,जत येथे राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

राजे रामराव महाविद्यालय,जत येथे राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

जत वार्ता न्यूज
By -

उदयोन्मुख संशोधन व शाश्वत विकास या विषयावर सायन्स विभागाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन

 

जतवार्ता न्यूज नेटवर्क | जत :
     राजे रामराव महाविद्यालय,जत येथे सायन्स विभागाच्या वतीने उद्यानमुख संशोधन व शाश्वत विकास या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन बुधवार दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील, राष्ट्रीय कार्यशाळेचे समन्वयक प्रा.कृष्णा रानगर, सहसमन्वयक प्रा.डॉ.मल्लाप्पा उर्फ प्रकाश सज्जन, सचिव प्रा.वैभव चांदवले व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाल यांनी दिली.
           या कार्यशाळेचे उद् घाटन सकाळी अकरा वाजता होणार असून या कार्यशाळेस उद् घाटक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बायोकेमिस्ट्री विभागाचे प्रमुख प्रो.किसन कोडम व अध्यक्ष म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कौस्तुभ गावडे हे उपस्थित राहणार असून या कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून शिवाजी विद्यापीठातील सायन्स विभागाचे बी.ओ.एस.चेअरमन व रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रो.डॉ.गोविंद कोळेकर व सांगोला महाविद्यालय, सांगोला येथील बायोकेमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ.प्रकाश बनसोडे उपस्थित राहणार  आहेत. ही कार्यशाळा भविष्यात येऊ घातलेले संशोधन हे मानवाच्या व समाजाच्या शाश्वत विकासासाठी असले पाहिजे म्हणून या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या राष्ट्रीय कार्यशाळेस जास्तीत जास्त प्राध्यापक व संशोधकानी सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ.सुरेश पाटील व राष्ट्रीय कार्यशाळेचे समन्वयक प्रा.कृष्णा रानगर यांनी केले आहे.