yuva MAharashtra भक्ती ही केवळ शब्दांत नव्हे, तर आचरणातून प्रकट व्हावी– सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज

भक्ती ही केवळ शब्दांत नव्हे, तर आचरणातून प्रकट व्हावी– सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज

जत वार्ता न्यूज
By -

जत मध्येही स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान उत्साहात संपन | जिल्ह्यात १७ ठिकाणी जल स्वच्छता अभियान संपन्न

जतवार्ता न्यूज नेटवर्क | सांगली : 
     पाणी हे निसर्गाचे अमूल्य वरदान आहे. जीवनाचा मूलाधार आणि मानवसभ्यतेची जीवनरेखा असलेले हे जल स्वच्छ व संरक्षित राहिले, तर केवळ पर्यावरणच नव्हे, तर मानवसमाजाचे एकूण आरोग्य आणि संतुलन अधिक सक्षम होते. याच विचाराला कृतीरूप देत नैसर्गिक जलस्रोत, नद्या, तलाव, सरोवरे आणि समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छता व संवर्धनासाठी उभारलेला व्यापक उपक्रम आज जन-माणसासाठी प्रेरणेचा स्रोत ठरत आहे. ही चळवळ केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून जागरूकता, जबाबदारी आणि सामूहिक सहभागाचा ठोस संदेश देणारी ठरली आहे.
        ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे भव्य आयोजन सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९३० शहरांमधील १६०० हून अधिक ठिकाणी यशस्वीरीत्या पार पडले. सुमारे १२ लाख स्वयंसेवकांनी यात सहभाग नोंदविला यामध्ये सांगली जिल्ह्याअंतर्गत १७ शाखांमध्ये स्वच्छता करण्यात आल्याची माहिती सांगली सातारा झोनचे झोनल इन्चार्ज श्री नंदकुमार झांबरे यांनी दिली या अभियान अंतर्गत जत शाखेमध्ये जत नगरपालिका पिण्याच्या पाण्याची टाकी, शासकीय रुग्णालय तसेच बिरनाळ तलाव येथील पाणी पुरवठा करणाऱ्या विहीर परिसराची स्वच्छता करण्यात आली यास नगरपालिका यांनीही सहकार्य केले हा उपक्रम केवळ पर्यावरणीय प्रयत्न नव्हता; तर अध्यात्म, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम होता. या माध्यमातून जनमानसात कर्तव्यभाव आणि जागरूकतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होईल.
     संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या पुढाकाराने, बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत ‘प्रोजेक्ट अमृत’ हा उपक्रम राबविण्यात आला. 
दिल्लीतील बुराडी चौक येथील मैदान क्रमांक ८ येथे आयोजित विशेष सत्संग कार्यक्रमात सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी अमृतमय विचार व्यक्त करताना सांगितले की, बाबा जींच्या शिकवणी या केवळ स्मरण करायच्या नसून त्या जीवनात अंगीकारण्यासाठी आहेत. खरी श्रद्धांजली ही शब्दांनी नव्हे, तर कृतीतून अर्पण केली जाते. आपण त्यांच्या अनुयायी असल्याचा दावा करीत असू, तर प्रेम, सेवा, करुणा आणि समदृष्टी यांसारख्या मूल्यांचा स्वीकार आपल्या दैनंदिन जीवनात झाला आहे का, याचे आत्मपरीक्षण आवश्यक आहे. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचे संपूर्ण आयुष्य मानवकल्याणासाठी समर्पित होते.
     या सेवाभावाची परंपरा पुढे नेत मिशनतर्फे ‘संत निरंकारी हेल्थ सिटी’सारखे मानवसेवेचे प्रकल्प उभारले जात आहेत. ही केवळ आरोग्यसुविधांची उभारणी नसून करुणा व समर्पणाची जिवंत अभिव्यक्ती आहे. जसे ब्रह्मज्ञान आत्म्यास शांती देते, तसेच ही आरोग्यसेवा समाजातील सर्व स्तरातील माणसाना शारीरिक सदृढता आणि सशक्त जीवनासाठी सहायक ठरेल.
     स्वच्छता अभियान संपन्न झालेवर त्याच ठिकाणी विशाल सत्संगचेही आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये बाहेरील स्वच्छतेबरोबर मनाच्या आंतरिक शुध्दतेचा संदेश देण्यात आला.