जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डफळापूर परिसरात प्रचाराला वेग आला असून भारतीय जनता पार्टीचे आमदार मा. श्री. गोपीचंद पडळकर साहेब यांनी डफळापूर येथे नागरिकांशी थेट संवाद साधत भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी डफळापूर जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. स्वप्नाली मनोज मासाळ, डफळापूर पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार श्री. महेश गावडे तसेच बाज पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार मनिषाताई भाऊसाहेब दुधाळ यांच्या प्रचारार्थ आमदार पडळकर यांनी गावोगावी भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. “विकास, पारदर्शकता आणि जनहित हाच भाजपचा अजेंडा असून सक्षम व कर्तृत्ववान उमेदवारांना साथ देणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
या जनसंवाद कार्यक्रमास जत नगरीचे प्रथम नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी सर, चंद्रशेखर गोब्बी साहेब, माजी समाजकल्याण सभापती आकाराम दादा मासाळ, माजी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, परशुराम (बंडू) चव्हाण सर, शंकर वगरे सर, अभिजीत चव्हाण, उपसरपंच गणेश पाटोळे, बाजचे सरपंच राज गडदे, भाऊसाहेब दुधाळ, खलाटीचे सरपंच ज्ञानेश्वर देवकाते, गुलाब पांढरे, सुदाम सवदे, अशोक सवदे, पोपट सवदे, संजय पाटील, कांबळे मेजर, विकास वाघमारे, दत्ता माळी, माजी सरपंच दीपक लंगुटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच डफळापुर परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आमदार पडळकर यांनी सडेतोड उत्तरे देत विकासकामांची दिशा स्पष्ट केली. यावेळी उपस्थितांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देत विजयाचा निर्धार व्यक्त केला. डफळापूर गटात भाजपच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

