जतवार्ता न्यूज नेटवर्क :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुका जत येथील संख येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संख जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. कविता किरण पाटील, संख पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार श्री. सदाशिव उर्फ अप्पू दर्गाकर तसेच गिरगांव पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार श्री. रविकुमार बगली यांच्या प्रचारार्थ उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या जाहीर सभेत आमदार मा. श्री. गोपीचंद पडळकर साहेब यांनी उपस्थितांना संबोधित करताना, “जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून गावागावात विकास पोहोचवायचा असेल तर सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख नेतृत्वाला साथ देणे गरजेचे आहे. भाजपचे उमेदवार हे केवळ निवडणुकीपुरते नव्हे तर कायम जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील,” असे ठाम मत व्यक्त केले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा उल्लेख करत त्यांनी भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी जत नगरीचे प्रथम नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी सर, शेतकरी नेते महेश खराडे, माजी नगराध्यक्ष अशोक बन्नेनवर साहेब, किरण पाटील सर, गुरू पाटील सर, राजेंद्र कन्नुरे, युवा नेते विजय पाटील, आण्णाराया बिरादार, दीपक नाटेकर, शरणाय्या शिळे, मुरलीअप्पा घाळी, संतोष बिरादार, सरपंच सुभाष करांडे, नितीन पाटील, सरपंच श्रीमंत पाटील, आमसिद्ध बिरादार, आप्पा सुसलाद, मलकारी पुजारी, प्रकाश वालेकर, नगरसेवक राजू यादव आदी मान्यवरांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच संख परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेदरम्यान उपस्थित नेत्यांनीही उमेदवारांच्या कार्याचा आढावा घेत विकास, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण व आरोग्य सुविधा या मुद्द्यांवर भाजपच्या माध्यमातून भरीव काम झाल्याचे नमूद केले. एकूणच संख येथे झालेल्या या जाहीर सभेमुळे भाजपच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाली असून आगामी निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

